सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी (दि. 13) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे हे असणार आहेत, अशी माहिती भाजपच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी शनिवारी दिली.
मोहन वनखंडे म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्हा दौरा यशस्वी करण्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित झाले. ते सकाळी सांगली येथे गणेशाचे दर्शन घेतील. त्यानंतर सांगलीतून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता पक्षाची जिल्हा संघटनात्मक बैठक व मेळावा होणार आहे.
त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तेथेच पक्षाच्या सोशल मीडियाची बैठक होणार आहे. त्यानंतर सांगलीच्या खणभाग येथे बूथ कमिटीची बैठक होणार आहे. खणभाग येथे नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमास आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सा
यंकाळी मिरजेतील भारत नगर येथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवार पेठ या ठिकाणी धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमास ही ते उपस्थित राहणार आहेत. रात्री मिरजेतील वखार भाग येथे असणाऱ्या पाटीदार भवन येथे सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.