महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दिपकजी केसरकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार उद्घाटन, प्रकाशन आणि पुरस्कार सोहळा!
पांचगणी या निसर्गरम्य ठिकाणी स्वीट मेमेरीज हायस्कूल येथे “कविता : तुझी आणि माझी!” मार्फत दिनांक २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध कविवर्य अरुण दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित काव्य महोत्सव आणि कविसंमेलन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. सदर संमेलनास महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री सन्माननीय दिपकजी केसरकर साहेब, आमदार मकरंद (आबा) पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या संमेलनास चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, गुरुनाथ मिठबावकर, मॅप्रो किंग मयूर व्होरा, मा.उपमहापौर केशवदादा घोळवे, आशिष राजे, अनिल जाहीर, गौतम सातदिवे, चंद्रकांत पवार, संग्रामसिंह नलावडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, लक्ष्मीताई कऱ्हाडकर, नितीनभाई भिलारे, मा. महापौर राहुलदादा जाधव, पुरुषोत्तम जाधव आणि इतर अनेक मान्यवर येणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कविवर्य उद्धव कानडे, कवी चंद्रकांत वानखेडे, कवी प्रकाश होळकर, कवी हनुमंत चांदगुडे, कवी नारायण सुमंत, कवी संपत गर्जे, श्रीकांत पाटील, कवयित्री कविता कदम आणि इतर मान्यवर कवी, कवयित्री उपस्थित राहणार आहेत.
संयोजन समितीतील मान्यवर छाया सीमा खंडागळे ( सचिव), उपाध्यक्ष मेघना पाटील, संतोष जगताप (कार्याध्यक्ष), रघू देशपांडे (सह सचिव), मनोज भारशंकर (कोषाध्यक्ष), विकास देशमुख (संमेलन कार्यवाह), तसेच संजय पवार, राजेश जाधव, मानसी चिटणीस, चंदना सोमाणी, स्मिता धर्माधिकारी, जान्हवी रहाटकर,
अर्चना भोर करंडे, गणेश शिवलाड, तुकाराम कांबळे, सुनील बोरसे, डॉ. चंदू पवार, पौर्णिमा शिंपी, रंजना देशमुख, वैभव कुलकर्णी, विकास गजापुरे, व्यंकटेश कल्याणकर, हिमानी टिळक आणि इतर मान्यवर कवी आणि कवयित्री उपस्थित राहणार आहेत.या काव्य सोहळ्यास अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समूह संस्थापक ज्ञानेश सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9921297001/ 9922409358 या क्रमांकावर संपर्क साधावा.