Wednesday, November 6, 2024
Homeराज्यनांदेड येथील कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी राज्य सरकाने...

नांदेड येथील कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी राज्य सरकाने केले १४.७८ कोटी रुपये मंजूर…

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मानले राज्यसरकारचे आभार

नांदेड – महेंद्र गायकवाड

थोर विचारवंत व साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १४.७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभारआहे.

कै. नरहर कुरुंदकर यांचे हे स्मारक पूर्णत्वास यावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य शासनाकडे अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा चालवला होता व त्यास अखेर यश आले आहे. सन २०१० मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती.

सुमारे २ कोटी रूपयांचे कामही पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यासारख्या थोर साहित्यिक व विचारवंतांचे स्मारक यथोचित व्हावे, यासाठी अधिक काम करण्याची मागणी समोर आली होती. त्यानुसार अशोकराव चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना याच खात्यामार्फत दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करून घेण्यात आला होता.

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. त्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी चव्हाण हे सातत्याने प्रयत्नशील होतो. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय भाषणात या प्रस्तावाच्या मंजुरीचे आश्वासन त्यांनी मिळवून घेतले होते. त्यानुसार आज याबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे.

कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे असे अशोकराव चव्हाण यांनी म्हण्टले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: