Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी सांगली दौरा...

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी सांगली दौरा…

सांगली – ज्योती मोरे.

भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सध्या महाराष्ट्रात दौरा चालू असून ते प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक कार्यक्रम व बैठका घेण्यासाठी प्रवास करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी त्यांचा दिवसभर सांगली जिल्हा दौरा आयोजित केला आहे. त्यामध्ये बाईक रॅली, कार्यकर्त्यांचा मेळावा , कोअर कमिटी बैठक, पत्रकारांबरोबर वार्तालाप, संघ परिवारातील कार्यकर्त्यांबरोबर बैठक, सोशल मीडिया कार्यकर्त्यांबरोबर बैठक, धन्यवाद मोदीजी अभियाना अंतर्गत लाभार्थींच्या भेटीगाठी..

नूतन मतदार नोंदणी अभियान सहभाग, तसेच धनगर समाज व लिंगायत समाज मेळावा असा भरगच्च कार्यक्रमाचा दौरा श्री बावनकुळे यांचा होणार आहे. त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी, सर्व शक्ती केंद्रप्रमुख ,बूथ प्रमुख ,मंडल कार्यकारिणी तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांच्या संयोजक सहसंयोजक व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली व मेळाव्याला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

तसेच इतर विविध कार्यक्रमात अपेक्षित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या त्या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.दीपक बाबा शिंदे, ग्रामीणजिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज बाबा देशमुख आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक श्री. शेखर इनामदार यांनी केले आहे. दिवसभरातील सर्व कार्यक्रमाला संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: