Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगलीतील निसर्गरंग फाउंडेशनच्या सायकलवारी शहीद स्मारकापासून सुरुवात...

सांगलीतील निसर्गरंग फाउंडेशनच्या सायकलवारी शहीद स्मारकापासून सुरुवात…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील निसर्गरंग फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांगली ते पंढरपूर सायकल वारीचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी आयोजन केले आहे.

या वारीचा शुभारंभ आज सकाळी त्रिकोणी बागेजवळच्या शहिद स्मारकापासून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि डॉ. महेश शहा यांच्या हस्ते करण्यात आला.

krishna vally school sangli

दरम्यान या वारीच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला झाडांचा आणि देशी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात येणार असल्याचं तसेच कवठेमंकाळ तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक चारुता सागर यांच्या मळणगाव या गावी साहित्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष पत्रकार कुलदीप देवकुळे यांनी दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: