सांगली – ज्योती मोरे.
सांगली जिल्ह्यात शेतातील मोटर आणि स्टार्टर चोरीच्या वाढल्याने त्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी केल्या होत्या. त्यानुसार उमदी पोलिसांनी तपास चालू केला असता, गुप्त बातमीदाराने मौजे बालगांव मधील लालसाब मुल्ला यांच्या शेतातून मोटर आणि इलेक्ट्रिक स्टार्टर आणि मीटर हे गावातील विठ्ठल आव्वाण्णा माळी यांने चोरल्याचे सांगितले.
त्यानुसार, उमदी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, माळी यांने सदर चोरी केल्याचे कबूल केले.त्यांने घराच्या मागील बाजूस लपवून ठेवलेली मोटार,स्टार्टर आणि मीटर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी आणि रिमांड दिली आहे. याबाबत अधिक तपास उमदी पोलीस ठाणे करत आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, गणेश संकपाळ, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, सोमनाथ पोटभरे, वहिदा मुजावर,संजय पांढरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल आप्पासो बोडके आदींनी केली.