नरखेड – अतुल दंढारे
नरखेड कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे धान्य खरेदीचा शुभारंभ दिनांक 07/11/2022 रोज सोमवार ला धान्य बाजार आवार नरखेड येथे झाला. यावेळी यांच्या हस्ते कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुरेशरावजी आरघोडे, उपसभापती श्री. चंद्रशेखरजी मदणकर, संचालक, श्री. दिनेश्वरजी राऊत,श्री.संजयजी दळवी, श्री.जानरावजी ढोकणे, श्री. घनशामजी फुले, श्री.अरुणरावजी वंजारी, श्री. रामलालजी मरस्कोल्हे व अन्य शेतकरी य यांच्या प्रमुख उपस्तिथ करण्यात आला.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुरेशरावजी आरघोडे यांचे हस्थे प्रथम लिलाव असलेले श्री. दिनेश्वरजी राऊत, मलापूर व श्री.गणेशराव उपासे, पिपंलगाव (वखाजी) या शेतकऱ्यांचे दुपट्टा, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंडीत पहिल्या दिवशी सोयाबीनची सुमारे 200 क्विंटल आवक होती. शेतकऱ्यांनी आपलेकडे सोयाबीन, मका, फल्ली कृषिमाल विक्रीकरिता आणला.
शुभारंभाच्या दिवशी प्रती क्विंटल प्रमाणे भाव फल्ली – 5350 ते 7650 रुपये, मका- 1900 ते 2000, सोयाबीन – 5350 ते 5750 विक्रमी भाव मिळाला यावेळी बाजार समितीचे अडते, व्यापारी श्री. इद्रीस खा हस्ते खा पठाण, श्री.शरद खुटाटे,श्री. सुनील खंडेलवाल मोवाड,श्री. सागरजी महंत,
श्री. रमेशजी कांबळे, श्री. मधुकर बोबडे श्री.सिताराम कठाणे, श्री. विनोद सरोदे, श्री. विनोदरावजी भिसे, बाजार समितीचे सचिव श्री. सतिश येवले, कोषपाल श्री. राधेशाम मोहरिया, श्री. सुनील कडू, श्री. पुरुषोत्तम दातीर,अमोल ठाकरे,विनोद रहाटे, राहुल सोमकुवर, रविंद्र बांदरे, अशोक कुकडे बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी आदी उपस्तिथ होते.