आकोट – संजय आठवले
आकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस श.प यांचे अधिकृत उमेदवार ॲड. महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचाराचा झंजावात सर्वत्र दिसत असून जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच युवा कार्यकर्ते मतदार संघ पिंजून काढत आहेत.
यात प्रामुख्याने डाॅ. अभय पाटील, माजी आमदार संजय गावंडे , दिलीप बोचे , ब्रह्मा पांडे, अनोख राहणे, मायाताई म्हैसने, मनीषाताई मते, डॉ. गजानन महल्ले, संजीवनी बिहाडे, विजय ढेपे, गजानन वानखडे,अशोक बिहाडे, आदींसह शेकडो पदाधिकारी व नेत्यांनी महेश गणगणे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी अहोरात्र झटत असून ॲड. महेश गणगणे यांचा विजय सुनिश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. ज्येष्ठ पदाधिकारी देखील प्रचार मोहिमेत व्यस्त असून गावोगावी सभा व लोकांच्या भेटी घेत आहेत. अकोला जिल्ह्याचे काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील यांनी देखील स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे.
गावोगावी ते मतदारांच्या भेटी घेत आहेत. आणि ॲड. महेश गणगणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन गावक-यांना करित आहेत. गावागावात महेश गणगणे यांना उत्तम प्रतिसाद लाभत असून त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे.
आज आकोट विधानसभा मतदारसंघाचे चित्र पाहता मतदारसंघात महेश गणगणे यांची बाजू भक्कम असून जवळपास त्यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाचे वातावरण मतदारसंघात निर्माण केले आहे.
इपीएस ९५ पेन्शनर संघटनेचा आकोट मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश गणगणे यांना पाठिंबा जाहीर. देवराव पाटील.
ईपीएस ९५ पेन्शनरांच्या ऑल इंडीया कोऑर्डीनशन कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार संघटनेच्या सभासदांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे जाहीर केले. त्यामुळे पेन्शनर संघटनेच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे भाजपच्या विरुध्द मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानिर्णयानुसार आकोट विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडी चे तथा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसेचे अधिकृत उमेदवार महेश गणगणे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष देवराव पाटील, कार्याध्यक्ष संजय मालोकार, गोपाल मांडेकर, मुकुंदराव गावंडे अध्यक्ष आकोट, रामदास आसलकर, माधवराव खोटरे, हिंम्मत मोरे,
प्रल्हादराव मोहोकार, उमाकांत मेहरे, आर.एम. काटोले, हेमंत गणगणे, विठ्ठल पाचपोर, सतिष ठाकरे, सचिन ठाकरे, राऊत, बोळे, ठाकरे, गजानन पाटील, गोपालराव राऊत, धर्मराज सरोदे, गजानन काकड, राजरतन वानखडे, अशरफ खा पठाण, शेख मुसा, रामेश्वर सिरसाट, रमेश काटोले, साहेबराव देवरे इत्यादींनी केले आहे.