अमरावती – रूफ टॉप सोलर योजना,मुख्य मंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी धोरण २०२०, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, गो ग्रीन योजना, मोबाईल ॲप या व इत्यादी सेवांची जनजागृतीसाठी महावितरणकडून विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात महावितरणचे स्टॉल लाऊन माहिती देण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा वकील संघ व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि.१३ नोव्हे.) नियोजन भवनात आयोजित कायदेविषयक जनजागृती विधी सेवा महाशिबिराच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या प्रदर्शनात इतर शासकीय कार्यालयांसोबत महावितरणच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्याकरीता स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्री दिलीप पांढरपट्टे व जिल्हा व सत्र न्यायालय अमरावतीचे प्रमुख न्यायाधीश श्री व्ही.पी.पाटकर व इतर मान्यवरांनी शासनाच्या इतर विभागासह महावितरणच्या स्टॉलला भेट दिली व विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच वीजेचा संबंध प्रतियेक कुटूंबापर्यंत असल्याने महामेळाव्यात उपस्थित बहुतांशी लोकांनी महावितरणच्या स्टॉलला भेटी देऊ माहिती घेतली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर,सहाय्यक विधी अधिकारी श्रीकांत चेंडे,उपकार्यकारी अभियंते विवेक राऊत, विनय लव्हाळे, बाळासाहेब खंडारे, नरेंद्र चामाटे, प्रतिज्ञा हजारे ,हरीश अंबाडकर,श्याम इझाते इत्यादी यावेळी उपस्थित होते.