महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने 10 SSC Result 2023 निकाल जाहीर केला असून दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के यंदाही कोकण विभागाने बाजी मारत 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.05 टक्के एवढा लागला आहे.
MSBSHSE बोर्डाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
कोकण : 98.11 टक्के, कोल्हापूर : 96.73 टक्के, पुणे : 95.64 टक्के, मुंबई : 93.66 टक्के, औरंगाबाद : 93.23 टक्के, अमरावती : 93.22 टक्के, लातूर : 92.67 टक्के, नाशिक : 92.22 टक्के, नागपूर : 92.05 टक्के
mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीचा निकाल 2023 जाहीर केला आहे, परंतु अधिकृत वेबसाइट जड ट्रॅफिकमुळे क्रॅश होण्याआधीच आपला निकाल पाहून घ्या….
SSC Result 2023 ऑनलाइन स्कोअर तपासण्यासाठी स्टेप
सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresults.nic.in ला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC 10वी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
निकाल तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा.