स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आसाम रायफल्स आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये केंद्रीय निमलष्करी दल, SSF आणि रायफलमनमध्ये 24369 कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेसह, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे जी 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 10वी उत्तीर्ण पुरुष/महिला उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे…
पात्रता १० वी पास
वय: 1 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे (आरक्षित श्रेणीसाठी नियमानुसार सूट)
अर्ज: 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2022
परीक्षा पद्धतीत 5 मोठे बदल…
१. आधी परीक्षा 100 गुणांची होती, आता ती 160 गुणांची असेल.
२ .पूर्वी परीक्षा सोडवण्यासाठी ९० मिनिटे दिली जात होती, आता ६० मिनिटे मिळणार आहेत
३. पूर्वी प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण निश्चित केला होता, आता प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील.
४. पूर्वी प्रश्नांची संख्या 100 होती, आता 80 प्रश्न विचारले जातील
५. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने सर्व श्रेणींच्या वयोमर्यादेत एकदाच 3 वर्षांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसएससी जीडी परीक्षेत, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.