Monday, December 23, 2024
Homeखेळएस.आर.के.इंडो किड्स च्या हेतांशी ला गोल्ड मेडल...

एस.आर.के.इंडो किड्स च्या हेतांशी ला गोल्ड मेडल…

  • कराटे स्पर्धेत मिळवले गोल्ड.
  • जगतिक महिला दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन.

नरखेड – जागतिक महिला दिनानिमित्त महिला कराटे चॅम्पिअनशीप 2023 चे आयोजन वास्का कराटे असोशीएशन, सिको काई कराटे असोसिएशन व लाठी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुगत बुद्ध विहार बाभुलबन, नागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विदर्भातील अनेक कराटेपटूनी सहभाग घेतला होता.

एस. आर. के. इंडो किड्स जलालखेडा या शाळेमध्ये के.जी.1 मध्ये शिकत असणारी हेतांशी नरेंद्र बिहार या विद्यार्थिनीने कुमिते कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल तर कातामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. 4 वर्षाच्या हेतांशीने गोल्ड मेडल मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.तिच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी तिचे कौतुक केले असून तिने तिच्या यशाचे श्रेय आई वडील शाळेच्या प्राचार्य, वर्गशिक्षक व प्रशिक्षक नरेंद्र बिहार याना दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: