रामटेक – राजू कापसे
दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी श्रीराम शिक्षण संस्था अंतर्गत श्रीराम सार्वजनिक वाचनालय व ताई गोळवलकर महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचा तसेच ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
ह्या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ सुरेखा बोरकर ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय विभागातील कर्मचारी श्री देवेंद्र अवथरे तसेच आभार प्रदर्शन श्री दिनेश गयगये यांनी केले.
या प्रसंगी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. विजय राऊत, डॉ.संतोष जेगठे, डॉ. राहुल हंगरगे,सौ पोकळे मॅडम, धोटे मॅडम, श्री देशभ्रतार सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच पुस्तक प्रदर्शनीचा लाभ रामटेक येथील अनेक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम सार्वजनिक वाचनालय आणि ताई गोळवलकर महाविद्यालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.