Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यलोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत...

लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत…

आत्तापर्यंत 44287.28 ब्रास गाळ विविध तलावातून उपसला

गावपातळीवर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मोहीम सुरु

नांदेड – महेंद्र गायकवाड

सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तलाव व धरणामधून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या या मोहिमेत सामाजिक संस्था व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, तसेच तलावातील काढलेला जास्तीत जास्त गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेवून जावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धरणामध्ये, तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणातील व तलावातील साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेवून जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो) विभागातर्फे लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे यावर्षीच्या हंगामात निश्चितच जलसंचय वाढणार आहे.

तसेच पूरप्रतिबंधक उपाययोजना होऊन शेताची सुपिकता वाढणार आहे. जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत जसे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग नांदेड- 3356.89 ब्रास, मृद व जलसंधारण विभाग-618.37 ब्रास, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड 40206.01 ब्रास गाळ काढला आहे.

कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (द) नांदेड-106.007 ब्रास अशी आत्तापर्यत 44287.28 ब्रास गाळ जिल्ह्यातील विविध तलावामधून काढण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध 40 तलाव व धरणामधून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. नॅशनल हायवे विभागाने त्यांना देण्यात आलेल्या कामांच्या परवानगी मधून 201410 ब्रास गाळ/मुरुम काढून नव्याने निर्मित शेततळे शेततलावाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहनानुसार जलसमृध्द अभियानातर्गंत लोकसहभागातून ही मोहिम सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी व विविध विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह गावपातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी यांचे प्रयत्नांमधून सुरु आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: