न्युज डेस्क : उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका भरधाव कारचा कहर पाहायला मिळाला आहे. या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन दुचाकीस्वाराला धडकली. त्यानंतर दुचाकी कारमध्ये अडकली. मात्र त्यानंतरही कारस्वार थांबले नाहीत. तो भरधाव वेगाने कार चालवत राहिला आणि दुचाकी गाडीखाली अडकली. कार वेगाने धावत असून तिच्या मागून ठिणग्या बाहेर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दहा किलोमीटरपर्यंत भरधाव कारने दुचाकीला रस्त्याच्या मधोमध ओढत नेले. कार चालकाने कारला ब्रेक लावला नाही. परिणामी दुचाकीस्वार रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे संपूर्ण प्रकरण रायबरेलीतील उंचाहर कोतवाली भागातील खोजपूरशी येथील आहे. रात्री उशिरापर्यंत कार चालकाने आपली कार एवढ्या वेगाने चालवली की त्याच्या गाडीखाली दुचाकी अडकल्याचे त्याला समजले नाही.
बराच पुढे गेल्यावर टोलनाक्याला पोलिसांनी नाकाबंदी करून अडवले तेव्हा त्याला समजले. या घटनेचा मागील कार मधील एकाने मोबाइल वर व्हीडिओ चित्रित केला. यानंतर पोलिसांनी कारस्वाराला अटक केली. पोलीस कार चालकाची चौकशी करत आहेत. एका अनियंत्रित कारचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या
भरधाव कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेल्याची ही पहिलीच घटना नाही. असे अपघात यापूर्वीही झालेले आहेत. असे असतानाही वेगात गाड्या चालवणाऱ्यांनी धडा घेतला नाही. राजधानी दिल्लीच्या कांझावाला आणि दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये अशा वेदनादायक अपघात घडले आहेत.