Sunday, December 22, 2024
HomeUncategorized'फुलराणी'चा दिमाखदार प्रिमियर...

‘फुलराणी’चा दिमाखदार प्रिमियर…

गणेश तळेकर

ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘फुलराणी’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. यात अभिजीत पानसे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, जयवंत वाडकर, रसिक सुनिल, ओंकार राऊत, रोहिणी निनावे, सोनाली खरे, गौरी नलावडे, अरुण कदम, आयेशा मधुकर, दिव्या सुभाष, आशय कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन आदि मान्यवर कलाकार उपस्थित होते.

उत्तम चित्रपट अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर यामुळे ‘फुलराणी’ रसिकांची मने जिंकत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक फुलाचा सुवास वेगळाआणि रुबाब त्याहून वेगळा.

सुगंधाची उधळण करणाऱ्या फुलांप्रमाणे कोमेजल्यावरही आपला सुवास तसाच ठेवणाऱ्या फुलांची खासियत जरा जास्त खास असते. आपल्यातला हाच रुबाब घेऊन आपल्यातील ‘फुलराणी’ शोधायला बाहेर पडलेल्या शेवंता तांडेल ची कलरफुल स्टोरी तुमच्यातील ‘फुलराणी’ शोधायला मदत करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी आणि चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला.

सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर या दोघांसमवेत या चित्रपटात ज्येष्ठ आभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, सायली संजीव, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, दिपाली जाधव, गौरव मालणकर वैष्णवी आंधळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटातील गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृताफिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेताबापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: