सांगली प्रतिनिधी :- ज्योती मोरे.
सांगली महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी 50 कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महानगरपालिकेच्या विविध योजनांसाठी ही प्रस्ताव द्या अनुदान मंजूर करू अशी ही ग्वाही त्यांनी दिली.
सांगली महापालिकेचे स्थायी समितीचे नूतन सभापती धीरज सूर्यवंशी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित विकास कामाबाबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभापती धीरज सूर्यवंशी यांचा निवडीबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार ,जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस किरण भोसले आदि उपस्थित होते.
स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी आमदार सुधीर गाडगीळ भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सभापतीची निवडणूक जिंकली आणि विकास कामांना प्रारंभ केला विविध विकास कामासाठी शासनाकडून विशेष अनुदान मंजुरीसाठी पाठपुरावा केला याबाबतचे विशेष अनुदानाचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत याचाच एक भाग म्हणून सभापती धीरज सूर्यवंशी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विकास योजना आणि कामासाठी विशेष अनुदानाची मागणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विकास कामासाठी 50 कोटीचे विशेष अनुदान लवकरच देण्यात येईल अशी घोषणा केली. अशी माहिती शेखर इनामदार यांनी केली.