Sunday, December 22, 2024
Homeराज्यमतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी ११ सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष...

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी ११ सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीच्‍या नोंदीचे आधार कार्डाशी जोडणी करण्‍याकरीता रविवार 11 सप्‍टेबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्‍यासाठी पुढाकार घ्यावा.

यासाठी रविवार 11 सप्‍टेबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

दिनांक 11 सप्‍टेबर 2022 रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. सदर विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन मतदार यादीतील तपशिलाशी मतदाराचे आधार क्रमांकाची जोडणी करणार आहेत. सदर दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नावे समाविष्‍ट असलेल्‍या सर्व मतदाराचे मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांकाची जोडणी करण्‍यात येणार आहे.

मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्‍यासाठी नमुना अर्ज 6 (ब) ERO Net , Garuda App, nvsp आणि VHA या माध्‍यमांवर देखील उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुलभतेसाठी Voter Helpline App ची सुविधा दिलेली आहे.

VHA व्‍दारे मतदारांना आधार क्रमांक लिंकींग करता येतील तसेच मतदारांना www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: