आकोट – संजय आठवले
देशात आणि राज्यात लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशातील विविध राजकीय पक्षांसह भारत निवडणूक आयोगाने ही कंबर कसली असून आयोगाने छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. जनतेला त्याची माहिती होण्याचे दृष्टीने आकोट उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी येत्या २६ जून रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि.०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि. ०१.०६.२०२३ ते दि.१६.१०.२०२३ पर्यंत पुनरिक्षण पूर्व कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. १७.१०.२०२३ रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून दि.०५.०१.२०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करावयाची आहे.
सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने आकोट २८ आकोट विधानसभा मतदार संघातील आकोट तालुक्यात दि. ०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता योग्य त्या उपाय-योजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जनतेस सदर कार्यक्रमाची माहीती होण्याचे दृष्टीने दि. २६.०६.२०२३ रोजी दुपारी ०२.०० वाजता तहसिल कार्यालय, आकोट येथे उपविभागीय अधिकारी आकोट तथा मतदार नोंदणी अधिकारी आकोट यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस सर्वांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी केले आहे.