Monday, December 23, 2024
Homeराज्यपातुरात बारा ज्योतिर्लिंग दर्शन व श्री अमरनाथ दर्शन चे विशेष आकर्षण...

पातुरात बारा ज्योतिर्लिंग दर्शन व श्री अमरनाथ दर्शन चे विशेष आकर्षण…

पातूर – निशांत गवई

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पातुर शाखेच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सर्वांकरिता अतिशय मनमोहक अशी श्री 12 ज्योतिर्लिंग दर्शन व सुंदर गुफा साकारून श्री अमरनाथ सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.

सर्व मनुष्य आत्म्यांना दुःख अशांती पासून मुक्त करून सर्वांना सुख शांती पवित्रतेचा मार्ग दाखवण्याकरितानिराकार परमपिता शिव परमात्मा अवतरीत झाले आहेत. त्यांच्या दिव्य अवतरणाची यादगार महाशिवरात्री उत्सवा निमित्त एजुवीला शाळेच्या समोर, श्री तुकारामजी गाडगे नगर बाळापूर रोड,

Shri Amarnath Darshan

पातूर येथे दि. 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांकरिता विनामूल्य दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने ब्रह्माकुमारी लीना दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज, पातूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: