Special 26 | इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने धाड टाकून लुटले…

0
422

मुंबई – धीरज घोलप

मुंबई विक्रोळी येथील Special 26 एका व्यावसायिकाच्या घरी 26 जुलै, 2022 रोजी इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने ही रेड टाकून काही रोकड जप्तीची कारवाई केली. पण ही कारवाई म्हणजे निव्वळ लुटमार झाल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण पार्क साईट पोलिसांकडे गेले. पोलिसांनी देखील कौशल्याने गुन्ह्याची उकल करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या.

एक महिन्याने अडकले पोलिसांच्या जाळ्यात विक्रोळी पश्चिमेकडील एका अलिशान टॉवरमध्ये व्यावसायिक पती राहतात. २६ जुलैच्या भरदुपारी महिला व त्यांचे सासू सासरे असताना पाच जणांचे पथक त्यांच्या अलिशान घरावर धडकले. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची ओळख सांगत त्या पथकाने संपुर्ण घराची झडती घेतली. पण त्यांच्या हाती केवळ एक लाखाची रोकड लागली. ते पैसे घेऊन पथक निघून गेले, पण थोडावेळाने बोगस आयटी अधिकायांनी लुटमार केल्याचे महिलेला समजताच त्यांनी पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनित कदम, उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे तसेच दिलीप मयेकर, अजित पाटील, रणजित ठाकूर, विक्रम कोल्हे, दिपक लहाने, हरिश्चंद्र गायकवाड या पथकाने शिताफिने तपास करीत चालक असलेला धीरज कांबळे,

मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा वसीम कुरेशी आणि इजाज अशा चौघांना पकडले. तर या गुन्ह्याचा मास्टर माईंड नितीन कोठारी तसेच निता कांबळे, मरीयम अप्पा आणि शमीम खान या चौंघाचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here