रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालय येथे पाच दिवसीय स्पंदन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ॲड. मा. आमदार श्री आशिषजी जयस्वाल उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रशांतजी पंडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन डॉ. उज्वला देवरणकर यांनी केले तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी केले.
स्नेहसंमेलनाची सुरुवात मैदानी खेळांपासून झाली क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, रनिंग अशा अनेक स्पर्धांचा यात समावेश होता. त्याचप्रमाणे पाककला , रंगोली ,फ्लावर डेकोरेशन अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या . विशेष आकर्षण म्हणजे महाविद्यालयातील फॅशन डिझाइनिंग च्या विद्यार्थिनी स्वतः डिझाईन केलेल्या पोशाखांचा फॅशन शो करण्यात आला.
तसेच मागील वर्षी महाविद्यालयात प्रथम आलेल्या कु. नम्रता नागपुरे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला तर सुरज कोडवते याला बेस्ट लायब्ररी यूजर अवार्ड देण्यात आला अमेय अवथरे या विद्यार्थ्याला गणतंत्र दिनाची मुंबई परेड येथे सहभागी झाल्याबद्दल गौरविण्यात आले.
विविध खेळांमध्ये कामगिरी बजावणारे श्वेता कुंभलकर, योगेश वाडीवे, करिष्मा सहारे, निधी राऊत, अनामिका टिचकुले यांचा देखील सत्कार माननीय आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम मध्ये श्रीराम शिक्षण संस्थेचे सदस्य विवेकजी तोतडे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ विजय राऊत व समारोपीय आभार प्रदर्शन डॉ राहुल हंगरगे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.