दिनांक 31 डिसेंबर रविवारला मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर येथे विज्ञान भारती,नागपूर व इस्रो संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री हरीश भाऊ पिंपळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी श्री विनायकराव वारे संचालक अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला सोबत प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक या होत्या अंतराळ संशोधन संस्थेची माहिती शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना मिळाल्यास सौ माधवी ठाकरे यांच्यासारख्या शास्त्रज्ञ तयार झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य यावेळी माननीय आमदार हरीश पिंपळे यांनी केले.
तालुक्यातील 87 शाळांनी प्रदर्शनीला भेट दिली सोबतच दिनांक 30 डिसेंबरला इसरो या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धा संपन्न झाली.त्यामध्ये जवळजवळ 50 शाळेतील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सोबतच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता अंतराळ संशोधनातील भारताचे योगदान महत्त्वाचे वाटते या कार्यक्रमाला डॉ.नसरुद्दीन अन्सार गटशिक्षणाधिकारी,श्री संजय मोरे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,डॉ. रवींद्र भास्कर अध्यक्ष जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, श्री संजय अप्तुकर सहयोगी वैज्ञानिक, डॉ.विजय भड इस्त्रो कॉर्डिनेटर वाशिम जिल्हा,
श्री देवानंद मुसळे अध्यक्ष तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, श्री अनिल देविकर मुख्याध्यापक मुर्तीजापुर हायस्कूल मूर्तिजापूर,पर्यवेक्षिका सौ.केसाळे मॅडम व तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद दाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रंजित सोळंके यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.