Thursday, September 19, 2024
Homeकृषीअकोला | हातरूण मंडळात सततच्या पावसामुळे सोयाबीन व तुर पाण्यात! पिकांचे नुकसान...

अकोला | हातरूण मंडळात सततच्या पावसामुळे सोयाबीन व तुर पाण्यात! पिकांचे नुकसान…

अकोला – अमोल साबळे

यावर्षी झालेल्या सतत पावसामुळे हातरूण मंडळातील नया अंदुरा,कारंजा रम, अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण,सोनाळा या परिसरात सतत पाउस पडत असल्याने पावसामुळे त्याचा विपरीत परिणाम खरीपाच्या पिकांवर होऊ लागला आहे. अतिपावसामुळे शेतातील कामे ठप्प झाल्याने खुरपणी, निंदन, फवारणी, वखरणी व डवरणी होऊ शकत नसल्याने. आहे तसेच हातरूण मंडळ शेतशिवारातील जलमय झाल्याने सोयाबीन, तुर पिकांचे नुकसान झाले आहे.

याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. परिसरातील दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होत आहे . यावर्षी पुर परिस्थिती पूर्णत: सतत पावसामुळे मात्र सततच्या पाण्यामुळे कपाशी पिकांला फटका बसला आहे. यावर्षी एकही नत्रक्ष विना पावसाचे गेलेले नाही. दररोज पावसाची हजेरी लागतच आहे. सूर्यदर्शनही दुर्लभ झालेले आहे. अति पावसाचा मात्र आता विपरित परिणाम होऊ लागला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक नियोजन अवलंबून असते. पावसामुळे कपाशीची उगवण चांगल्या प्रकारे झालेली आहे. झाडांना फुलही लागली आहे उन्हाअभावी शेतात वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ खुंटू लागली आहे. कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ लागल्याने, त्याचा फटका उत्पन्नावर बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी व कडक उन्ह पडावे अशी प्रार्थना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: