Monday, December 23, 2024
Homeक्रिकेटदक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन...

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन…

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळत आहे.दरम्यान, डेव्हिड मिलरबाबत एक हृदय हेलावणारी बातमी समोर आली आहे.डेव्हिड मिलर यांच्या मुलीचे निधन झाले आहे.मिलरने इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे हा दुःखद क्षण चाहत्यांशी शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड मिलर त्याच्या मुलीसोबत दिसत आहे.या व्हिडिओतील अनेक फोटोंमध्ये मिलरच्या मुलीच्या डोक्यावरचे केस दिसत नसले तरी बहुतांश फोटोंमध्ये ते दिसत आहेत.रिपोर्टनुसार, मिलरची मुलगी कॅन्सरशी झुंज देत होती.उपचारादरम्यान ती तिच्या वडिलांसोबत जास्त वेळ घालवताना दिसली.पण मिलर यांनी मुलीच्या आजाराबाबत कोणतेही वक्तव्य किंवा संदेश दिलेला नाही.

मिलरने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “माझ्या स्केटला मला तुझी खूप आठवण येईल!लढण्याची आवड तु वेगळ्या पातळीवर नेली.नेहमी आश्चर्यकारकपणे सकारात्मक होते आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य होते.तू मला खूप काही शिकवलंस.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: