भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्नी साक्षी धोनी हिने आपल्या आई वडिलांसह शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. लवकरच महेंद्रसिंग धोनीनाही साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येणार असल्याच साक्षीने सांगितलंय.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्नी साक्षी, महेंद्रसिंग धोनी यांच्या सासू शीला सिंह आणि सासरे आरके सिंह यांनी काल 31 जानेवारी रोजी शिर्डीत येवुन साईबाबांच्या रात्रीच्या शेजाआरतीला हजेरी लावली होती.
त्याच बरोबर आज सकाळी साईबाबांच्या मंदिरात येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. यांचा बरोबरीने साईबाबांनी आपले जिवन व्यतीत केलेल्या द्वारकामाई आणि गुरस्थान मंदिरातही जावून दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांची मुर्ती व शॉल देवुन साक्षी धोनीसह आई वडिलांचा सत्कार करण्यात आलाय.
दरम्यान , साईबाबांच्या दर्शनावेळी साक्षी धोनी यांच्या समवेत शिर्डीतील उद्योजक संग्राम देशमुख आणि अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते हे उपस्थिती होते. यावेळी साक्षी धोनी यांनी कोते यांच्याशी शिर्डीसह राज्यातील अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
कोरोना महामारीच्या आधी साक्षी या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आज साईबाबांचे बोलवणे आल्यानं आई वडिलांना समवेत शिर्डीत येवुन साईबाबांचे दर्शन घेण्याचा योग आल्याचंही साक्षीने सांगितलय. साईबाबांनी आम्हाला सर्व काही दिले आहे.
आज देशाच्या सुख शांतीसाठी आणि कुटुंबियांनासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असुन लवकरच महेंद्रसिंग धोनी यांनाही साईबाबांच्या दर्शनासाठी घेवुन येणार असल्याच साक्षी धोनी यांनी कोते आणि देशमुख यांच्याशी बोलतांना सांगितलंय.