Sunday, December 22, 2024
Homeखेळसोनु बेठेकर स्वर्ण तथा रौप्य पदकाने सन्मानीत...

सोनु बेठेकर स्वर्ण तथा रौप्य पदकाने सन्मानीत…

रामटेक – राजू कापसे

१६ व १७ डिसेंबर २०२२ ला डॉ. आंबेडकर विद्यापीठ, औंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या प्रौढ स्पर्धेत वय गट ३५ मध्ये रामटेक मधील सोनू बेठेकर यांनी ५ की. मी. चालण्याच्या स्पर्धेत स्वर्ण पदक तसेच स्टीपल्स चेस रन व लाँग जंप मध्ये अनुक्रमे रौप्य अशी एकूण ३ पदकांची कमाई केली.

तीन वर्षांपूर्वी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मध्यम वय असलेल्या आणि त्यापेक्षा प्रौढ व्यक्ती स्वस्थ राहण्याच्या उद्देशाने अश्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय स्पर्धांची सुरुवात केली होती. स्वस्थ भारत सुंदर भारत ही त्यामागची कल्पना आहे.

सोनू बेठेकर फेब्रुवारी मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर खेळात भाग घेणार आहेत. सोनू बेठेकर हॉलिबॉल साठी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण पण देतात हे येथे उल्लेखनीय. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आगामी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: