नांदेड – महेंद्र गायकवाड
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रातोळी पुलावरून जबरदस्तीने कंटेनर चोरून सात चोरटे लातूरच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना सोनखेड पोलिसांनी सदर कंटेनर आडवून एका आरोपीस अटक केले असून इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
मुखेड पोलीस स्टेशन येथुन 30 जानेवारी रोजी नियंत्रण कक्ष नांदेड यांना माहिती देण्यात आली की, पोलीस स्टेशन नायगांव हद्दीतील रातोळी पुलावर कंटेनर क्रमांक डिएनबी- 09/यु-9153 अडवुन सदर कंटेनर चालकास मारहाण करून चालकाचे हात पाय बांधुन त्यास पोलीस स्टेशन मुखेड हद्दीतील शिखारा या गावांचे हद्दीत टाकुन देवुन सदर चालकाचे ताब्यातील कंटेनर सात चोरटयांनी जबरदस्तीने पळवून नेले असे माहितीवरून पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड यांच्याकडुन नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व रात्रगस्त अधिकारी व अंमलदार यांना सतर्क राहुन आपापले पोस्टे हद्दीतील रोडवर पेट्रोलींग करून सदरचा कंटेनर मिळुन आल्यास त्यातील चोरटयांना व कंटेनर ताब्यात घेण्या बाबत सुचना देण्यात आल्या.
सोनखेड पोलीस स्टेशन येथील रात्रगस्त पोलीस अंमलदार पोकॉ / 1471 रमेश वाघमारे, व सोबत पोलीस जीप चालक पोकों / 778 अतुल नागरगोजे यांनी रात्रगस्त दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन प्रभारी सपोनि विशाल भोसले यांनी तात्काळ रात्रगस्त अंमलदार यांना वरील प्रमाणे सुचना देवुन रवाना केले.
सदर अंमलदार यांनी सतर्क राहुन प्रॉपर सोनखेड अंतर्गत नांदेड ते लोहा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर पाळत ठेवुन सतर्क असतांना सदर क्रमांकाचा कंटेनर हा भरधाव वेगात लातुरच्या दिशेने जात असल्याने सदर पोलीस अंमलदार यांनी जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालुन सदरचा कंटेनर समोर शिताफीने शासकीय जीप लावुन कंटेनर थांबला असता आतील 05 चोरटे हे कंटेनर थांबताच पळुन गेले,
इतर पाच चोरटे सोनखेड परिसरात पळुन गेल्याने पोस्टे सानेखेडचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर चोटयांचा पाठलाग करून एका चोरट्यास नामे गंगाधर बळीराम सलकमवाड, वय 28 वर्षे, रा. डेरला ता. लोहा यास पकडले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असतां त्याने त्यांचे साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपी व कंटेनर पोलीस स्टेशन नायगांव यांच्या ताब्यात देवुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार, डॉ. सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली विशाल भोसले, सपोनि, पोकों / 1471 रमेश वाघमारे, जीप चालक पोकॉ / 778 अतुल नागरगोजे यांनी सदरील कामगिरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.