Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजन'कुणी गोविंद घ्या…?' नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज…

‘कुणी गोविंद घ्या…?’ नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज…

गणेश तळेकर – आपण नात्यांत एकमेकांना गृहीत धरतो. स्वतःच वेगवेगळ्या कल्पना करून घेतो. पण एकमेकांशी बोलण्याने; तसेच आपण आपले मत शांतपणे मांडले तर समस्या नक्कीच सुटतात, असा विचार मांडणारे ‘कुणी गोविंद घ्या…?’ हे नवीन नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. सध्या या नाटकाच्या तालमी जोरात रंगल्या आहेत. शुक्रवार, १७ मार्च रोजी गडकरी रंगायतन, ठाणे या नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. 

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत अशी तरुण कलाकारांची फळी या नाटकात भूमिका साकारत आहे. यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. रॉबिन लोपेज व राम सगरे यांचे नेपथ्य, संकेत शेटगे यांचे संगीत व शिवाजी शिंदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. उदयराज तांगडी हे निर्मिती प्रमुख आहेत. नाटकाचे निर्माते म्हणून मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.  

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: