Tuesday, July 16, 2024
spot_img
HomeMarathi News Todayआदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटाकानी केली दगडफेक…विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...

आदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटाकानी केली दगडफेक…विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली ही मागणी…

राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर काल औरंगाबादच्या वैजापूर येथील कार्यक्रमात दगडफेक झाल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. ते औरंगाबादच्या वैजापूर भागात पक्षाच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आदित्य ठाकरे जात असताना दगडफेक झाल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ठाकरेंच्या कार्यक्रमातील सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यामध्ये गांभीर्याने हस्तक्षेप करण्यात यावा, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, औरंगाबादचे एसपी मनीष कलवानिया यांनी सांगितले की, दोन प्रतिस्पर्धी गट घोषणाबाजी करत होते आणि दगडफेकीची कोणतीही घटना घडली नाही. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून ताफा महालगावच्या दिशेने जात असताना दगडफेक करण्यात आली.

हिंदू आणि दलित समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, “जमाव स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. जमावामधील असामाजिक तत्वांनी दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.

ठाकरेंच्या कार्यक्रमाला पुरेशी सुरक्षा न दिल्याने एसपींसह पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: