Friday, October 18, 2024
Homeराज्यपातूर तालुक्यातील कार्ला येथील चक्क काही व्यक्तीने चाळीस माकडे नेले पळवून..!

पातूर तालुक्यातील कार्ला येथील चक्क काही व्यक्तीने चाळीस माकडे नेले पळवून..!

वन विभागाला कोणत्याही प्रकाची महिती नाही.

पातूर :- निशांत गवई

पातूर तालुक्यांतील पातूर व आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत चक्क वन विभागाच्या डोळ्यासमोरून व भर दिवसा चाळीस माकडे बाहेर जिल्ह्यातील कही व्यक्तीनी पळून नेल्याचा प्रकार घडला आहे. त्या मुळे परिसरातील चक्क येकाच खळबळ उडाली आहे. पातूर तालुक्यातील कार्ला येथील गावातील चाळीस ते पन्नास माकडाचे अनेक वर्षापासून वास्तव होते. मात्र गावातली गावातील काही व्यक्तींना त्याचं माकडाचा त्रास होउ लागल्या मुळे गावातली कही पुढारी व्यक्तींनी चाळीस ते पन्नास हजार रूपये जमा करुन.

औरंगाबाद येथील सिल्लोड येथील खाजगी व्यक्तीना माकडे पकडुन नेण्याचा कंत्राट दिला तोच गावातील सिलोड येथील टीमने चक्क चालिस माकडे पळउन नेले. मात्र या घटनेची तीळ मात्र खबर वन विभागाला मिळाली नाही. व गावकऱ्यांनी सुध्हा वन विभागाला कळवले नाही. काही लहान पिल्ले सुध्हा अजुन गावातली वस्त्यावयाला आहेत मत्र त्यांची आई पकडुन नेल्याने कावरे बावरे फिरताना गावात बघावयास मिळत आहेत.

तर काही माकडाचे लहान पिल्ले पकडुन नेल्याने माकडे आवाज करुण मोठ्याने आवाज करीत आहेत. त्या मुळे वन प्रेमी कडून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. व माकडे माकडे पकडुन नेणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी करतं आहेत.वन कायद्या नुसतं. वन प्राण्यांना व्यक्ती खाऊ घालू नाही शकत. व त्याच्या परवानगीशिवाय कोणीही पकडू नाही शकत. मात्र सदर घटना माकडांना पिंजर्यामध्ये खाऊ घालून त्यांना पकडुन नेले.

सदर घटनेचा कोणत्याही प्रकारची महिती अद्याप नाही. व कोणत्याही प्रकारची आमच्या कडून परवांगी घेतली नाही. मात्र सदर घटनेची चौकशी करुन सदर घटणा घडली असल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

धीरज मदने
वन परिक्षेत्र अधिकारी पातूर

सदर खटनेची कोणत्याही प्रकारची महिती. मिळाली नाही. व माकडे पकडण्याची कुठलिही परवानगी दिली नाही. सदर घटनेची चौकशी करून दोषिवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

विश्वनाथ चव्हाण
वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव

माकडाचा गावकऱ्यांना खूप त्रास होता. त्या मुळे गावकरी वैतागून गेले होते. त्या मुळे चाळीस माकडे पकडुन नेले.मात्र अश्या प्रकारे माकडे पकडुन नेने खरच चुकीचे आहे .

सोमनाथ बोबडे. ग्रामस्थ कार्ला

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: