राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वनाडोंगरीतील सामान्य जनतेच्या विविध मागण्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन….
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर- हिंगणा -वानाडोंगरी शहरातील विविध समस्या सोडविण्यात यावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनत नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, शहरांतर्गत दळणवळणाची रस्ते पूर्णपणे खराब झाली आहेत, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका बळावला आहे, शहरात पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था नाही.
नगरपरिषदेच्या शाळा,अंगणवाडी यांचे व्यवस्थापन योग्य नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर गुरे ढोरे उभे राहतात ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरात नियमित स्वच्छता होत नाही. ठिकठिकाणी नाल्या चोक झाले आहेत त्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरासमोर साचत आहे. त्याचबरोबर नगरपरिषदे द्वारा शहरातील भूखंड नियमितीकरण करण्याच्या व नवीन घरांना बांधकामाच्या मंजुरीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी हा भ्रष्टाचार करत आहेत आहेत त्यावर प्रशासनाने आळ आणावा आणि शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या असे म्हटले आहे.
यावेळी वानाडोंगरी शहरातील समस्यांबाबत चर्चा करताना बंग यांनी मुख्याधिकारी व अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. आणि जर शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या समस्या सुटत नसतील आणि सुरू असलेला भ्रष्टाचार बंद होत नसेल तर मी अन्यायग्रस्त नागरिकांसह नगरपरिषदेवर हल्लाबोल आंदोलन करेल असा इशारा दिला.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वानाडोंगरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ,माजी नगरसेवक नारायण डाखळे, माजी नगरसेवक प्रशांत सोमकुवर, लोकमन छपेरे, हंसराज पाटील, अनुप डाखळे, यादवराव कनेर,राजेंद्र मने,नीरज पायासी, सोमेश ससाणे, पंकज नंदनवार,बंडू शिंदे,दुर्गेश यादव, करण यादव,समीर गजभिये,शुभम जोध, आकाश घाटोळे,निहाल शेंद्रे, नरेंद्र बर्वेकर, सुशांत निबाळकर,राहुल देवगिरीकर प्रामुख्याने उपस्थित होते.