अहेरी:
अहेरी.. महाराष्ट्र राज्यातील सर्वात टोकातील बस स्थानक अहेरी जेंव्हा बस स्थानक निर्मिती करताना राष्ट्रीय कांग्रेस चे सरकार होते. आदिवासी बहूल क्षेत्रातील लोंकाच्या सेवे साठी निर्मीती केले. परंतू अहेरी बसस्थानक मध्ये विविध अडचणी मूळे बसेस चे तूटवडा, मॅकनिक स्टाप कमी, ना दूरस्त गाड्या, ड्रायव्हर चा तूटवडा, हल्ली एका बसचे स्टेंरीग ड्रायव्हर च्या हातात आले त्यामूळे प्रवासी थोडक्यात बचावले अन्यथा बस प्रशासन चे दूर्लक्षामूळे खूप मोठी दूर्घटना होता होता टळली.
यापूर्वी बसचे टप्पर उडून आकाशात संचार करीत होते.असे विविध समस्या भेडसावत आहेत . त्यामूळे प्रवासाना दोन -दोन तास बसेस ची वाट पाहावी लागत आहे. पाच तालूक्यातील व लांब जाणा-या प्रवाशी जनते ला खूपच त्रास सहन करावी लागत आहे. ही गंभीर बाब आहे. या सर्व विषयांचे दखल घेवून. आनंदराव गेडाम माजी आमदार आरमोरी विधानसभा यांच्या नेतृत्वात तालूका कांग्रेस कमेटी अहेरीचे शिष्टमंडळ घेवून अहेरी बस स्थानक येथे स्मिता सतावने गडचिरोली विभाग प्रमूख यांच्याशी चर्चा करून दूरध्वनी द्वारे एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना परीस्थितीची जाणीव करून देण्यात आली त्यांनी लवकरात लवकर समस्या चे निराकरण करण्याचे आश्वाशन दिले.
समस्यां निकालात जर काढण्यात नाही आले तर शेवटी बस स्थानक अहेरी ला कूलूप लावण्यात येईल असे इशारा देण्यात आला . या शिष्टमंडळ मध्ये डॉ. निसार हकीम ता. अध्यक्ष , नामदेव आत्राम किसान सेल अध्यक्ष , हनिफ भाई शेख अल्पसंख्याक अध्यक्ष ,रज्जाक पठाण यूवक कांग्रेस अध्यक्ष , बबलू सडमेक अनूसूचित जमाती अध्यक्ष , सूरेश दूर्गे, व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.