अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले मूर्तिजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष व अमरावती जिल्ह्याच्या नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य तसेच अखिल भारतीय VSSS उपाध्यक्ष शिवसेना महाराष्ट्र मुख्य समन्वयक नानकराम नेभनानी यांची विश्व हिंदू वासिंद ग्लोबल प्राइड ऑफ सिंधू अवॉर्ड 2024 याने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान सोहळा मुंबई येथे मुकेश भाई पटेल मेमोरेन्टल हॉल येथे विश्व भारत हिंदी असोशियन यांनी आयोजित केला होता. समाजसेवक नानकराम नेभनानी यांनी दोन वर्षापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
मूर्तिजापूर येथून राजकारणाला सुरुवात करणारे नानकराम नेभनानी हे मूर्तिजापूर शहरातील दिन्दुब्ल्यांचे मायबाप म्हणून ओळख निर्माण केली त्याच बरोबर राजकारणातही एक वेगळा ठसा उमटविल्या नंतर त्यांनी तोच वसा अमरावतीत शहरात सुरु ठेवला, त्यांनी दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे पद तसेच मूर्तिजापूर नगरपालिकेचे २५ वर्षे सदस्य असण्याबरोबरच ते पाच वर्षे मूर्तिजापूर नगरपालिकेचे बिनविरोध अध्यक्ष होते. समाज सेवेसोबत उत्कृष्ट राजकारणी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.
त्यांनी यशस्वी राजकीय खेळी खेळताना त्यांनी आपल्या भाषा आणि संवाद कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रवृत्तीने राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. तसेच, आता त्यांच्याकडे अमरावतीच्या नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदाची जबाबदारी सोपविल्याने ते चांगल्या प्रकारे पार पडतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.