Monday, December 23, 2024
Homeराज्यकरवीर शिवसेनेच्या वतीने समाजभिमुख उपक्रम...

करवीर शिवसेनेच्या वतीने समाजभिमुख उपक्रम…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप.

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १४ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते.

बँकेमध्ये जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने एक तर पायी चालत जावे लागते किंवा रिक्षा मधून जाण्यासाठी रिक्षावाला प्रत्येकी १०० ते २०० रुपये घेतो. तसेच बँकेच्या दारामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने तो पेन्शन धारक सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेला की संध्याकाळी ४ ते ५ वाजताच घरी येतो. पेन्शनधारकांची परवड होऊ नये व ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगावातील पेन्शन धारकांना आज उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली.

करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज ४०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,मा.उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले,बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण,अजित पाटील, योगेश लोहार, केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर,मिलींद प्रभावळकर, विजया माने आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: