सांगली – ज्योती मोरे
सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बदनामी कारक फेसबुक कमेंट केले बद्दल शेख यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात सुरज सावंत -पाटील याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील अक्षय भालेराव या युवकाचा निर्दयी व क्रूर खून झाला होता.त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच अन्य मागण्यांचे ही निवेदन मिरज प्रंताधिकार्यांना शेख यांनी दिले होते.
माहिती करिता त्याची एक प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांनाही देण्यात आली होती त्याला अनुसरून शेख यांच्या कार्यकर्त्याने फेसबुक वर तशी पोस्ट केली व त्याबरोबरच त्याचे निवेदन देताना चा फोटो पोस्ट केला होता या पोस्टवर सुरज सावंत- पाटील नामक एका व्यक्तीने आक्षेपार्य व बदनामीकारक कमेंट केली जैलाब शेख यांना फाशी द्यावी अशा प्रकारची कमेंट फेसबुक वर केली आहे.
या तक्रारीत जैलाब शेख यांनी म्हटले आहे की या कमेंट नंतर समाजात माझ्या बद्दल दुमत झाले व उलट सुलट चर्चा सुरू झाली.सदरच्या व्यक्तीचा माझा काडीमात्र संबंध नसताना त्या व्यक्तीने माझे बद्दल केलेल्या कमेंटने त्या व्यक्तीचा माझ्या बद्दलचा राग दिसून येत आहे सदरच्या व्यक्तीला असे करणेस कोण भाग पाडत आहे व का? याची चौकशी होणे जरुरीचे आहे व या नंतर माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तशी तक्रार जैलाब शेख यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या कडे लेखी केली.
यावेळी सर्व पक्षी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दलित चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते सागर मेटकरी,सामाजिक कार्यकर्ते हयात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शकील पिरजादे, मिरज शहर इदगाह कमिटीचे मेहबूबली मनेर,
सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा बुजरुक,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमीर सनदी,बहुजन समाज पार्टीचे सलीम आत्तार,नासिर शेख,वसीम मकानदार,हुसेन सय्यद,सात गवंडी,जमीर शेख,तय्यब गडकरी,अल्ताफ सय्यद व शहानुर कुडचीकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन देऊन निषेध व्यक्त करून संबंधितावर कठोर शिक्षेची मागणी केली.