बुलढाणा – हेमंत जाधव
आज सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रेमलता ताई वाघ यांनी तहसील मधे ठिय्या दिला. अस्तित्व फाऊंडेशन अध्यक्ष्या प्रेमलता ताई वाघ ह्या आज बुलढाणा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात प्रचंड शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन पोहचल्या, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, मोर्चा तहसील मधे पोहचल्यानंतर शेतकऱ्यांसह वाघ यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या दिला होता. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनी कडे खरीप व रब्बी मिळून एकूण 10,42,801 शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.
त्यातील 4,66,921 लोकांनी ऑनलाइन-ऑफलाइन तक्रारी केलेल्या आहेत परंतु यापैकी 1,55,549 इतक्याच तक्रारी यादीमध्ये पात्र म्हणून घेण्यात आले आणि 3,11,372 शेतकऱ्यांच्या तक्रारी शुल्लक कारणांवरुन अपात्र ठरविण्यात आले. एकंदरीत 1,02,565 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. म्हणजे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून एकुण १०,४२,८०१ पिक विमा काढलेले असतांना लाभार्थ्यांची संख्या मात्र १,०२,५६५ इतकीच आहे.
जवळपास ९,४०,२३६ पिक विमा धारकांना पिक विम्याचा लाभच भेटला नाही. अशाच प्रकारे मोताळा तालुक्यात खरीप व रब्बीचे एकूण 50658 शेतकर्यांनी पिक विमा काढला आहे. यामध्ये 20524 शेतकर्यांनी तक्रारी केल्या त्यात 9389 इतकेच शेतकरी पात्र यादीमध्ये समाविष्ट केले गेलेत व एकूण 11,157 अपात्र ठरविण्यात आले. आणि फक्त 2449 शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या अश्या विविध मागण्यांसाठी वाघ यांनी मा मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.
या निवेदनात प्रमुख मागण्या
१) शेतकऱ्यांना सरसकट 100% विना अटी शर्ती शिवाय पीक विमा नुकसान भरपाई मिळणे बाबत.
२) शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे बाबत.
३) तक्रार नोंदणीसाठी दिलेले ७२ तास ही वेळ वाढवून देण्यात यावी.
४) खरीप पिकाची ई-पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. जरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्रचंड शेतकऱ्यांसह तीव्र मार्गाने आंदोलन करू व सदरची जवाबदारी ही शासनाची असेल असा इशारा ही वाघ यांनी दिला.