भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या आपल्या पहिल्या यादीत 99 मतदार संघातील उमेदवार जाहीर केलेत. यावेळी राज्यात भाजप 155 ते 160 च्या दरम्यान जागा लढण्याची शक्यता आहे. भाजपची दुसरी यादी उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. यामध्ये आणखी किमान 55 ते 60 उमेदवारांची नावे जाहीर होतील अशी आशा आहे. या यादीमध्ये मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचा समावेश असल्याच्या अफवा सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत पसरविल्या जात आहे. मात्र त्यापूर्वीच भाजप मध्ये बंडखोरी होणार असल्याच्या चर्चाही रंगत आहे. तर हरीश पिंपळे यांना तिकीट मिळाले तर भाजप मधील दुसरा गटातील उमेदवाराला उभं करणार असल्याने भाजप ची हि जागा आता धोक्यात आल्याचे दिसत आहे.
मूर्तिजापूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. 2009 पासून सलग तीन टर्म आमदार हरीश पिंपळे या मतदारसंघात नेतृत्व करतात. मात्र 2019 च्या निवडणुकीत आमदार हरीश पिंपळे अगदी काठावर निवडून आले होते. सोबतच गेल्या पाच वर्षात त्यांच्याकामाबद्दल लोकांची नाराजी प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच या मतदार संघात आता दुसरा उमेदवार देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत ती आव्हान पक्ष बाहेरच्या आव्हानांपेक्षा पक्षांतर्गत अधिक आहेत. हरीश पिंपळे यांची कार्यक्षेली त्यांच्या भोवतालची माणसं आणि यातच दुखावलेले कार्यकर्ते यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी मिळण्यात अनेक अडचणी येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
येत्या पाच वर्षात या मतदार संघाच आरक्षण संपणार असल्याने पक्षाने यावेळी तरी चांभार समाजाला उमेदवारी मिळेल अशी आशा चांभार समाजातील कार्यकर्त्यांना आहे. गेल्या अनेक दशकापासून भाजप सोबत इमानेइतबारे राहून पक्ष सेवा करणाऱ्या या समाजातील व्यक्तीला तिकीट मिळाले पाहिजे असा समाजाचा सूर आहे. यासाठी पक्षातील काही लोकांनी संमती दर्शवत त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले. मात्र आता पुन्हा त्याच व्यक्तीला तिकीट मिळणार असल्याच्या चर्चेने आता बंडखोरीचे सुरु निघत आहे. तर या मतदार संघात आता यावेळी महाविकास आघाडीच्या उमेद्वारासोबत लढाई असल्याचे बोलल्या जाते. तर महाविकास आघाडीकडून तेजस जामठे यांना तिकीट मिळाले तर पुन्हा पिंपळे यांना उमेदवारी मिळू शकते अश्या चर्च्या सध्या मतदार संघात सुरू आहेत.