परीसरात ३ खदानिंना स्टील प्लॅन्ट ची प्रतिक्षा
येथील खदानीतील लाखो टन मॅगनिज जाते बाहेरील स्टिल प्लॅन्ट मध्ये…
रामटेक – राजु कापसे
रामटेक – प्रभु श्रीरामाचे तथा ऋषी मुनींचे पाय लागलेल्या या रामनगरी म्हणजेच रामटेक परिसरात निसर्गाने अनेक देन दिलेली आहे. ते मग जंगलस्वरूपी असो वा तलावस्वरूपी की मग खदानस्वरूपी. काळं सोनं निघते या खदानींमधुन. तब्बल तिन खदानी परीसरात आहेत मात्र उपयोग काय.
स्टिल प्लॅन्ट अभावी येथील संपूर्ण माल बाहेर इतरत्र पाठवावा लागतो. येथे स्टिल प्लॅन्ट उभारले असते तर नक्कीच रामटेक विधानसभा क्षेत्रात ‘ रोजगाराचा ‘ अक्षरशः पाऊस पडला असता यात दुमत नाही.
रामटेक विधानसभा क्षेत्रात तब्बल तिन मोठ्या खदानी आहेत. मनसर खदान, कांद्री खदान तथा बेलडोंगरी खदान. परीसरातील हजारो लोकांना येथे रोजगार मिळालेला असला तरी मात्र येथुन वर्षाकाठी लाखो हजार टन मॅगनीज काढण्यात येते तथा बाहेर राज्यात असलेल्या विविध स्टील प्लॅन्ट मध्ये पाठविण्यात येते.
या सर्व स्टील प्लॅन्ट मध्ये हजारो लोकांना सरळ सरळ रोजगार प्राप्त झालेला आहे. मात्र यात शोकांतीका अशी की रामटेक विधानसभा क्षेत्रात खदानी असुनही इतर राज्यातील लोकांना तेथे उभारलेल्या स्टिल प्लॅन्ट मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.
येथेच खदानी असतांना येथेच स्टील प्लॅन्ट उभारले असते तर रामटेक विधानसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगारांना येथेच रोजगार उपलब्ध झाला असता यात तिळमात्रही शंका नाही पण शोकांतीका अशी की गेल्या कित्येक वर्षापासुन येथे खदानी सुरू स्थितीत असुनही येथे स्थानीक कोणत्याही नेत्याने स्टिल प्लॅन्ट येथे उभारण्याचा अथवा आणण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.
येथील काही धनाढय नेत्यांमध्ये या परिसरात स्टिल प्लॅन्ट उभारण्याची तथा बाहेरील उद्योजकाला येथे जागा उपलब्ध करून देत येथे स्टिल प्लॅन्ट आणण्याची क्षमता आहे मात्र ‘ कोण एवढा खटाटोप करेल, आपलं राजकारणंच बरं ‘ असे म्हणत हेच नेते हात झटकतात.
तिन तिन खदानी उघड्या डोळ्यांनी पाहुनही सर्वपरी सक्षम असलेल्या स्थानिक एकाही नेत्याला येथे स्टिल प्लॅन्ट उभारण्याबाबद व त्यामाध्यमातुन हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबद सुचले नसावे याबाबद नवलच वाटते. तेव्हा निव्वळ निवडणुकीदरम्यान रोजगाराचा फतवा मिरविणेच या नेत्यांना जमते का ? असा खडतळ सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.
बेरोजगार भटकतच राहील काय ? – सत्येकार
रामटेक -मनसर परीसरातुन मॉईल कंपनी प्रत्येक वर्षी 2 लाख 80 हजार टन मॅगनीज पुढच्या 40 वर्षापर्यंत येथुन बाहेर घेऊन जाईल. आणि बेरोजगार उघड्या डोळ्यांनी पाहुनही रोजगारासाठी भटकतच राहील काय.
मॅगनीज प्रक्रिया उधोग -कारखाने याच क्षेत्रात उभारल्या गेले तर येथील बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. तेव्हा या दृष्टीने शासनाने पाऊले उचलावी अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी एका मुलखतीदरम्यान व्यक्त केली.