रामटेक – राजु कापसे
जागतिक दिव्यांग दिन’ हा ३ डिसेंबर रोजी राज्यासह देशात आणि जगात साजरा केला जातो. मात्र, दिव्यांगांच्या समस्या या अनेक वर्षांपासून कायम आहेत. दृष्टिहीन दिव्यांग, अस्थिभंग दिव्यांग, कर्णबधिर दिव्यांग असे विविध प्रकार दिव्यांगांमध्ये आहेत. या दिव्यांगांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी बच्चू कडूसारख्या नेत्यानं पुढाकार घेतला. मात्र, दिव्यांगांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अपंग मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतरही या समस्या तशाच आहेत.
यावेळी दिव्यांगजन च्या साक्षीमीकरनासाठी कार्य करणाऱ्या संस्था, क्षेत्रातील तज्ञ, विशेष शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होऊन जनजागृती पर रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, व दिव्यांगकारिता केलेल्या कार्याचा गौरव, मुलांचा गौरव असा असा या दिवसी उपक्रम राबवून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.
शितलवाडी येथील स्नेह सदन मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा शितलवाडी येथील दिव्यांग मुले व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या दिव्यांग मुलांना दिव्यांग कल्याण विभागामार्फत चिटणीस पार्क नागपूर येथे नियोजित कार्यक्रमात सहभागी करून मुलांचा उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न करवून घेतला.
या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे यांचा दिव्यांग क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसन व शिक्षणासाठी केलेल्या विविध कामासाठी शाल,श्रीफळ, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला… रामटेक मधील दिव्यांग मुलांची हि शाळा तालुकास्तरावरून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त असून व संपूर्ण राज्यातून दिव्यांग विभागातील एकमेव शाळा आहे. समाज कल्याण नागपूर विभागाद्वारा शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांचे या दिवसी कौतुक करण्यात आले… अशाप्रकारे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.