Snake Rescue : साप म्हटले आपण घाबरतो, मग तो विषारी असो कि बिनविषारी. सापाला तोंडाला तोड लावण्याची हिम्मत कोणीच करत नाही, पण एका बेशुद्ध पडलेल्या विषारी सापाच्या तोंडाला तोंड लाऊन एका पोलिसाने CPR देवून वाचविल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील नर्मदापुरममधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एक पोलीस हवालदार तोंडातून ऑक्सिजन देऊन सापाला CPR देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वास्तविक, सेमरी हरचंदच्या तवा कॉलनीत साप असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल शर्मा यांना मिळाली होती. 2008 पासून अतुलने सुमारे 500 सापांची सुटका केली आहे. डिस्कव्हरी चॅनल पाहून अतुलने सापाला कसे वाचवायचे हे शिकले आहे.
पाण्याच्या पाइपलाइनमध्ये साप असल्याचे अतुल शर्मा यांना समजले, त्याला काढण्यासाठी लोकांनी पाण्यात कीटकनाशक मिसळून पाइपलाइनमध्ये टाकले, त्यानंतर साप बेशुद्ध झाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक साप बेशुद्ध अवस्थेत आहे, त्याला पोलीस हवालदाराने उचलले आणि नंतर त्याचे तोंड त्याच्या फणाला लावले आणि त्याला सीपीआर देऊ लागला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकीकडे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचवेळी काही लोक पोलिस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
#MadhyaPradesh : ज़हरीले सांप की जान बचाने के लिए पुलिस वाले ने दिया CPR, VIDEO देख हैरत में पड़े लोग#CPR #SnakeRescue pic.twitter.com/FK8Xft2Myr
— NDTV India (@ndtvindia) October 26, 2023