Wednesday, October 23, 2024
Homeराज्य'भोगवटा प्रमाणपत्रा' विनाच उभी झाली स्मार्ट बाजार ची इमारत..?

‘भोगवटा प्रमाणपत्रा’ विनाच उभी झाली स्मार्ट बाजार ची इमारत..?

या स्मार्ट बाजारच्या इमारतीवर बुलडोजर चालणार का ?

भंडारा – सुरेश शेंडे

जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांचा प्रश्न

तुमसर येथील विनोबा भावे नगरातील भंडारा रोडवरील (गावठाण) सरकारी जागेची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावून ती खासगी जागा दर्शवून त्यावर टोलेजंग स्मार्ट बाजारची इमारत बांधण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या पटले कोम्पलेक्स मध्ये भोगवटा प्रमाणपत्रविणाच स्मार्ट बाजार सुरु केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोगवटा प्रमाणपत्र हे एक दस्तऐवज आहे जे नवीन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर स्थानिक सरकारी संस्था किंवा नियोजन प्राधिकरणाद्वारे जारी केले जाते. प्रमाणपत्र हा पुरावा आहे की लागू बिल्डिंग कोड, संबंधित नियम आणि कायद्यांचे पालन करून प्रकल्प बांधला गेला आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणे ही विकासकाची म्हणजे त्या मालकाची जबाबदारी आहे.मात्र ही जागा सरकारची की त्या खाजगी मालकाची यावर प्रश्न उपस्थित झाले आहे.तुमसर-भंडारा रोडवरील सदर जागेचे जुने खसरा क्र. ११०० असून त्याकरिता बनविण्यात आलेली बोगस आखीव पत्रिका ३२३१ च्या सिरीजमधील ही जागा आहे.

सन १९७२ मध्ये भूमी अभिलेख विभाग अस्तित्वात आल्यानंतर ही जागा नझूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या जागेकरिता नझूल विभागाद्वारे मूळ मालकाचा उल्लेख न करता शेतीकडे या शेऱ्यासह आखीव पत्रिका तयार करण्यात आली.

महाराष्ट्र भूराजस्व संहिता १९५४ च्या कलम २३३ ते २३७ प्रमाणे गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेली जागा ही तुमसर गावठाण नकाशामध्ये स्पष्ट दिसून येत आहे.घरमालकांसाठी,त्यांच्या मालकीच्या मालमत्तेची कायदेशीर स्थिती करण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मालमत्तेसाठी वैध भोगवटा प्रमाणपत्र नसताना, स्थानिक नगरपालिका संस्थेला कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा अधिकार आहे, कारण भोगवटा प्रमाणपत्र शिवाय, प्रकल्प अनधिकृत संरचना मानला जातो.या बाजारात पार्किंग ची व्यवस्था बरोबर नसल्याने रस्ता वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण केला आहे.गावठाण गायरान जागा ही सरकार मालकीची असते.

अश्या जागेला तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्या आदेशानुसार या स्मार्ट बाजारच्या इमारतीवर बुलडोजर चालणार का ? असा प्रश्न उपस्थित होते.तर याकडे सर्व तुमसर वासियांचे लक्ष लागले आहे.

भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय?

भोगवटा प्रमाणपत्र (OC) हे स्थानिक नगरपालिका प्राधिकरण किंवा इमारत प्रस्ताव विभागाद्वारे जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे, जे इमारत पूर्ण झाली आहे आणि भोगवटासाठी योग्य आहे हे सूचित करते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: