SL vs PAK Asia Cup 2022 Final – आशिया कप मध्ये झालेल्या फायनल सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत आशिया चषक 2022 च्या विजेतेपदाचा सामना पाकिस्तान विरुद्ध 23 धावांनी जिंकला आहे. यासह श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे.
श्रीलंकेने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 147 धावाच करू शकला. श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षेने 41 चेंडूत नाबाद 71 आणि वानिंदू हसरंगाने 36 धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने तीन बळी घेतले. आशिया कपच्या इतिहासात चौथ्यांदा जेतेपदाच्या लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. यापूर्वी या दोघांमध्ये तीनवेळा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेने दोनदा तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.
१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाने चौथ्या षटकात कर्णधार बाबर आझम आणि फखर झमान यांच्या विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाज 6 धावा करून बाद झाला. यानंतर हसरंगाने १७व्या षटकात तीन गडी बाद करत श्रीलंकेचा विजय निश्चित केला. मोहम्मद रिझवान 49 चेंडूत 55 धावा करून बाद झाला.
पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. यानंतर श्रीलंकेचा निम्मा संघ 10 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 17 धावांची 21 धावांची भागीदारी केली. निसांका 11 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. गुणतिलाकाही जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि त्याला 4 चेंडूत केवळ 1 धाव करता आली. यानंतर धनंजय डी सिल्वाही २१ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. कर्णधार दासुन शनाकाही अवघ्या दोन धावा करून बाद झाला. यानंतर हसरंगा आणि राजपक्षे यांनी पाचव्या विकेटसाठी 36 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली.
हसरंगा 21 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. भानुका राजपक्षेने चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूत 54 धावांची भक्कम भागीदारी करत श्रीलंकेला 170 धावांपर्यंत नेले. भानुका ४५ चेंडूत ७१ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. चमिकाने 14 चेंडूत 14 धावा केल्या.