सांगली – ज्योती मोरे
मिरजेतील रायझिंग स्पोर्ट्स क्लब च्या वतीने 35 बालकांनी भारतीय संस्कृतीचे जतन करत पारंपारिक वेशभूषा करून सलग एक तास स्केटिंग केले.मिरजेतील ओ टू पार्कमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या संस्कृतीचे दर्शन घडवून, छत्रपती श्री शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, झाशीची राणी, जिजामाता, महात्मा बसवेश्वर, आर्मी, नेव्ही,एअर फोर्स असे पोशाख परिधान करून खेळाडूंनी स्केटिंग केले सहभागीना प्रणव बिल्डकॉमचे मालक किशोर पटवर्धन आणि रायझिंग स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष ओंकार शुक्ल यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले आहेत