Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsसिक्कीमच्या नाथूला येथे झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटक ठार…११ जखमी…अनेकजण अडकल्याची भीती…

सिक्कीमच्या नाथूला येथे झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटक ठार…११ जखमी…अनेकजण अडकल्याची भीती…

सिक्कीम नाथूला येथे प्रचंड हिमस्खलन झाल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय अन्य 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक पर्यटक अडकल्याचीही शक्यता आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12.20 च्या सुमारास हिमस्खलन झाला. यात जखमी झालेल्या सहा जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम-नाथुला सीमा भागात झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी वृत्तसंस्था एएनआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडवरील 14व्या मैलावर बचावकार्य सुरू आहे. बर्फात अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर, अडकलेल्या 350 पर्यटक आणि 80 वाहनांचीही सुटका करण्यात आली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: