पुन्हा एकदा ‘बाजीराव सिंघम’ बनून गुंडांशी लढण्यासाठी अजय देवगण येणार आहे. ‘सिंघम 3’ या चित्रपटाबद्दल, ज्याची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टीचा हा अॅक्शन चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. आणखी एक मोठी गोष्ट समोर येत आहे की, त्यात दीपिका पदुकोणची एन्ट्री झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. हा 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रोहितच्या सुपर यशस्वी फ्रँचायझी ‘सिंघम’चा हा तिसरा भाग आहे. या वर्षी ऑगस्टपासून त्याचे शूटिंग सुरू होणार आहे.
यावेळी ‘सिंघम 3’ प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे, कारण अजय देवगणच्या सोबत दीपिका पदुकोण पडद्यावर दिसणार आहे. रोहित शेट्टीने ‘सर्कस’च्या एका कार्यक्रमात दीपिका लेडी सिंघम होणार असल्याची घोषणा केली होती. पोलिसांच्या गणवेशात ती एक्शन करताना दिसणार आहे.
अजय देवगण ‘भोला’मध्ये दिसला होता. आता तो मैदान या बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 23 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दुसरीकडे, दीपिका पदुकोण देखील अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’मध्ये ती हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’मधील एका खास गाण्यातही ती आहे. प्रभास आणि अमिताभ बच्चनसोबत तिचा ‘प्रोजेक्ट के’ही आहे.