Singer Dani Li : ब्राझिलियन गायक डॅनी ली यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असे सांगितले जात आहे की डॅनी ली (Dani Li) ने नुकतीच लिपोसक्शन सर्जरी केली होती, त्यानंतर काही समस्या सुरू झाल्या आणि तिचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूचे खरे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लिपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर दानी ली तिच्या स्तनांचा आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करणार होती. पण लिपोसक्शननंतरच तिला त्रास होऊ लागला. तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
‘मेट्रो’च्या रिपोर्टनुसार, डॅनी लीच्या पतीला प्रचंड धक्का बसला आहे. त्याला एक मुलगी देखील आहे, तिचे वय सात वर्षे आहे. डॅनी लीच्या कुटुंबीयांनीही इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला आहे. तसेच दानी ली (Dani Li) यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
लिपोसक्शन शस्त्रक्रिया म्हणजे काय?
लिपोसक्शन सर्जरीमध्ये शरीराच्या मुख्य भागातून अतिरिक्त चरबी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली जाते. हे मुळात लठ्ठपणा कमी करण्याचे तंत्र आहे. चेहरा, कंबर, छाती, मान आणि हनुवटी यासारख्या भागांवरील अतिरिक्त चरबी काढून टाकून स्लिम लुक दिला जातो.
🏴 DANI LI
— Estadão 🗞️ (@Estadao) January 25, 2024
Cantora morre aos 42 anos após procedimento estético no Paranáhttps://t.co/QfiR9ibv0B
दानी ली ब्राझीलमध्ये खूप प्रसिद्ध होती. तिला Eu sou da Amazonia मधून लोकप्रियता मिळाली, डॅनी लीने वयाच्या 5 व्या वर्षी गाणे सुरू केले. गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतांमुळे अनेक सेलिब्रिटींना जीव गमवावा लागला. ऑगस्ट 2023 मध्ये, अर्जेंटिनियन अभिनेत्री सिल्विना लुनाने कॉस्मेटिक सर्जरीनंतर आपला जीव गमावला.