सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील पास्टर गेले यांच्यावर घातलेले गुन्हे पाहता ते गंभीर स्वरूपाचे असल्याने या विरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मूक मोर्चाचा आयोजन केलं होतं, मात्र जिल्ह्यात कलम 144 लागू केल्याने सदरचा मोर्चा 20 जानेवारी रोजी काढण्याचा निर्णय आज लेप्रसी हॉस्पिटलच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे.
दरम्यान सदर मोर्चा मध्ये 30000 लोक सहभागी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. यासाठी ख्रिस्ती बांधवांसह बहुजन समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावं,असा आवाहन करण्यात आलाय. यावेळी रेव्ह.भंडारे, राम कांबळे,आकाश तिवडे, विजय वायदंडे, आशिष कच्ची, सीमा भोरे, प्रकाश तिवडे, सचिन जाधव, जीवन कांबळे, मंगेश वाघमारे, प्रभाकर सपकाळ, योगेश कोरे, अभय मोरे, राकेश सावंत, अनुष पुंदीकर, सूर्यकांत लोंढे, दिलीप भोरे, अल्बर्ट सावर्डेकर, सागर काळे,शशी कांबळे, संजय सोनुले, सुनील मोरे आदी धर्मगुरू सहअनेक मान्यवर उपस्थित होते.