पातूर – सचिन बारोकार
दि 6 जानेवारी रोजी चान्नी पो स्टे ला आलेगाव येथील अशोक काळदाते याच्या एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पास्को व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
या दाखल झालेल्या गुन्हा च्या विरोधात आज दि 8 रोजी आलेगाव येथील सर्व जातीय नागरिक व आलेगाव वासी यांनी रस्त्यावर उतरवून मूक मोर्चा काढला तसेच आलेगाव गावातील सर्व व्यापार बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला
तसेच या प्रकरणी सर्व गावकरी मंडळी यांनी चान्नी पो स्टे ला एक निवेदन देऊन या निवेदना मध्ये संबधित अशोक काळदाते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे तसेच कट रचून या गुन्ह्यात संबंधिताला अडकवले असल्याचे म्हटले आहे.
चान्नी पोलिसांनी कसून चौकशी करण्याची गरज…
संबधीत प्रकरणात या आधीच्या आलेगाव येथे घडलेल्या काही घटनांचा संबध आहे का?जेणे करून संबधित आरोपी ला या खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे याची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी आलेगाव वासीय करत आहेत.