दररोज शेकडो लोकं या रस्त्याने करतात ये जा…भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता ,वनविभाग मात्र सुस्त…
पातूर – मागील आठवड्यात पातूर तालुक्यातील भंडारज फाटा ते नांदखेड फाटा येथे रस्ता ओलांडतांना अनोळखी वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची ताजी घटना घडली असतांना आज परत याच रस्त्याने सायंकाळी भंडारज कचरा डेपो जवळील टेकडीवर पट्टेदार वाघ दिसल्याने परिसरातील नागरिकांसह या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने गांभीर्य पूर्वक लक्ष घालून येथील वाघाचा बंदोबस्त करावा ,जने करून भविष्यात जीवितहानी होणार नाही अशी मागणी जनतेनी केली आहे.
मागील आठवडयात रात्री १०वा भं डारज फाट्यावर पातूरच्या व्यक्तीला तीन बिबटे दिसले होते . फोटो मध्ये ज्या टेकडीवर वाघ बसलेला दिसत आहे ती सत्य घटना असून त्या टेकडीच्या पायथ्याशी पातूरवरून येणारा कचरा डेपो आहे . तिथे खूप काटेरी जाळ्या आहेत त्या जाळयात हे बिबटे बसलेले असतात . बाजूला दोनतीन पाझर तलाव आहेत त्यामुळे तिथे कोणीचं जात नाही आजही ते प्राणी तिथे आहेत . परंतू वनविभागाला मात्र अजूनही हे भयंकर वास्तव दिसत नाही.
या रस्त्याने दररोज शेकडो लोक मोटर सायकलने येजा करतात . भविष्यात एखादी भीषण घटना घडल्या शिवाय वनविभाग जागे होणार नाही. या शिवारात १०० रोही आहेत . तसेच हरणांचे खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे , येथे टेकडीच्या आतील भागात खूप काटेरी जाळ्या असून दिवसा व रात्री वाघांचा मुक्काम त्यामध्ये असू शकतो. या भागात खूप लोकांना तीन वाघ दिसल्याचे बोलले जात आहे तरी वनविभागाने घटनेचे गांभीर्य ओळखुन या वाघांचा बंदोबस्त करावा अन्यथा तेथे जीवितहानी होऊ शकते.
भंडारज कचरा डेपो जवळ वाघ दिसल्याचे काही लोकांनी सांगितले असून वनविभागाने तात्काळ गंभीर पूर्वक यामध्ये लक्ष घालावे,या परिसरातील शेतकरी,व रस्त्याने ये जा करणारे लोकं यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तात्काळ वाघांचा बंदोबस्त करावा
विनोद राऊत
समनव्यक शेतकरी संघटना अकोला जिल्हा